एसएससी परीक्षा २०२३ रद्द महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा शालेय शिक्षण विभागाने बुधवारी एका शासन निर्णयाद्वारे केली. दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात गुणपत्रिका/प्रमाणपत्रे देण्याबाबत स्वतंत्र आदेश जारी केले जातील, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदपत्रात जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात पडले. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीही येत होत्या.
याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. अखेर शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी शालेय शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याबाबत अधिकृत निर्णय जारी केला आहे. अशा परिस्थितीत आता दहावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
SSC परीक्षा 2023 रद्द’ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) रद्द करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विनियम 1977 मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत मंडळाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी माहिती उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे.