महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC लिपिक-टंकलेखक पदांसाठी एप्रिल महिन्यात भरती प्रक्रिया राबवणार आहे. यासाठी राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सध्या रिक्त असलेल्या आणि भविष्यात रिक्त राहणाऱ्या पदांसाठी प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत. त्यामुळे लिपिक-टंकलेखक पदांवरील सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये एमपीएससी ऑनलाइन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
MPSC ने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा 2023 मधून लिपिक-टंकलेखक संवर्गाची पदे प्रस्तावित आहेत, ज्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात दिली जाईल. त्यामुळे सर्व विभागांनी 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करावेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
लिपिक-टंकलेखक या पदांसाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यामुळेच त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर संबंधित भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातूनच घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली. आता एमपीएससीच्या माध्यमातूनच भरती प्रक्रिया पारदर्शक होईल, असा विश्वास स्पर्धक उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
जिल्हानिहाय पद भरती ची माहिती पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा